
सोमवार दिनांक १५ जून २०२६ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात पूर्व प्राथमिक विभागाचा शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. चंद्राच्या कलांची कमान, मुलांसाठी पायघड्या घालण्यात आल्या होत्या, प्रशालेमध्ये सजावट करण्यात आली होती. प्रशालेच्या मुख्याध्यापक माननीय अपर्णाताई साने यांनी मुलांना प्रवेशद्वारावर औक्षण केले. त्यानंतर मुलांच्या समवेत प्रशालेच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापक माननीय सौ. अपर्णाताई साने व प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक माननीय वासंती ताई बनकर यांनी गणपती बाप्पा, सरस्वती देवी व गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन केले. आपल्या पालकांसोबत विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये प्रवेश केला. यावर्षी खेळ गटाच्या वर्गातून अग्निहोत्र करण्यात आले. प्रत्येक वर्गाच्या वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याचे औक्षण करून विद्यार्थी व पालकांना पेढा देऊन तोंड गोड करण्यात आले.
अग्निहोत्र (हवन) मंत्रोपचाराने शाळेतील वातावरण अतिशय पवित्र व सकारात्मक झालेले होते. एक तासाच्या शाळेत पालकांनी मुलांसोबत शाळेत बसण्याचा अनुभव घेतला.
योग सप्ताहाचे औचित्य साधून पालकांकडून व विद्यार्थ्यांकडून छोटे छोटे व्यायाम प्रकार करून घेण्यात आले.
या सर्व कार्यक्रमात प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे विद्यार्थ्यांना चंद्राच्या कलांची माहिती व्हावी. म्हणून तयार करण्यात आलेली चंद्राच्या कलांची कमान व सेल्फी पॉईंट म्हणून ऍस्ट्रोनॉट तयार करण्यात आलेला होता.*या वाऱ्याच्या बसुनी विमानी सहल करूया गगनाची* या बालगीताप्रमाणे विद्यार्थ्यांनी एस्ट्रोनॉट सेल्फी पॉईंट मध्ये फोटो काढून चंद्रावर जाण्याचा काल्पनिक आनंद घेतला.
* वृक्षारोपणाचे महत्त्व कळावे म्हणून विद्यार्थ्यांना सूर्यफुलाच्या बिया वृक्षारोपणासाठी देण्यात आल्या.
अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात आला.