म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत

शिक्षण विवेक    20-Jun-2026
Total Views |

mes
नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे शाळेत स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा आकर्षक पद्धतीने सुशोभित करण्यात आली होती.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवासाची संस्मरणीय सुरुवात म्हणून त्यांच्या हातांचे ठसे घेण्याचा उपक्रमही राबविण्यात आला.
कार्यक्रमास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर, शाळेच्या महामात्रा डॉ. मानसी भाटे उपस्थित होत्या . माननीय मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे तसेच माननीय उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
या स्वागत समारंभामुळे नवागत विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आपुलकी, उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या सहभागामुळे कार्यक्रम आनंददायी व संस्मरणीय ठरला.