न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

शिक्षण विवेक    20-Jun-2026
Total Views |
des
दिनांक 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन प्रशालेत साजरा करण्यात आला. योग साधनेच्या माध्यमातून आपण मानसिक शांती, शारीरिक संतुलन आणि सुदृढ व निरोगी आरोग्य मिळवू शकतो. व्यायाम आणि आहार यांचा सुंदर संगम साधून आपण आपलं आरोग्य जपू शकतो असं शालाप्रमुख आशा माने यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी सिद्धार्थ बाबर, योगा प्लस संस्थेचे संस्थापक यांनी विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या योगासनांचे प्रात्यक्षिक करुन घेतले. विद्यार्थ्यांबरोबर शालासमिती अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनीही विविध योगासनांची प्रात्यक्षिके केली आणि विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुण्या भारती वाणी यांनी विद्यार्थ्यांना ओंकार आणि श्वासावर नियंत्रण मिळवण्याची कला शिकवली. आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त त्यांनी विद्यार्थ्यांकडून दररोज दहा मिनिटे योग करण्याचा संकल्प करून घेतला. त्यांनी आपल्या भाषणात आहार आणि विहार ह्या दोहोंचं महत्त्व सांगितलं. प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपमुख्याध्यापक महेश जोशी यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश शेलार यांनी केलं.
यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षिका मंजूषा शेलूकर, सुवर्णा चिटणीस, चंदा शहा, सुनीता सामदेकर इ. उपस्थित होते. आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका अंजली गोरे यांनी केले.