योग दिन प्रात्यक्षिकात शिक्षण आयुक्तांचा सहभाग

शिक्षणविवेक    22-Jun-2026
Total Views |
des
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेत झालेल्या योगासन प्रात्यक्षिकात, मा. शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह आणि शिक्षण उपसंचालक डॉक्टर गणपत मोरे यांनी सहभाग घेतला.
प्रशालेचे माजी विद्यार्थी, योग प्रशिक्षक सिद्धार्थ बाबर यांनी विद्यार्थी आणि उपस्थितांकडून योग प्रात्यक्षिके करून घेतली.
कोलकत्ता येथे झालेल्या मुख्य योग दिनाच्या कार्यक्रमातील माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रसारण यावेळी करण्यात आले.
शाळा समिती अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनीही यावेळी प्रात्यक्षिके करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
आत्मअनुशासन ही यशाची गुरुकिल्ली असून भगीरथ प्रयत्नांना पर्याय नाही. विद्यार्थ्यांनी वेळेचे महत्त्व ओळखून विद्यार्थी दशेतच भविष्याची दिशा निश्चित करावी. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून द्यावी, असं प्रतिपादन सिंह यांनी यावेळी बोलताना केले.
मुख्याध्यापक आशा माने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर उपमुख्याध्यापक महेश जोशी यांनी, प्रमुख उपस्थितांचा परिचय करुन दिला.
पर्यवेक्षक मंजुषा शेलूकर यांनी आभार मानले तर शिक्षिका सुनिता खरात यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
पर्यवेक्षक अंजली गोरे, क्रीडा विभाग प्रमुख रमेश शेलार आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
संगीत विभागाच्या वतीने यावेळी प्रात्यक्षिकांच्यापूर्वी योगगीताचे सादरीकरण करण्यात आले.