योग आणि सुरांचा संगम; शाळेत दुहेरी उत्सव

शिक्षणविवेक    22-Jun-2026
Total Views |
des
 
पुणे: दि.२१जून,शनिवार पेठेतील एन.ई.एम एस शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन व जागतिक संगीत दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी योगाचार्य डॉ.विदुला शेंडे यांनी विद्यार्थ्यांना पुरेशी झोप, योग्य आहार, योग्य विचार, योग्य आचार याचे महत्त्व सांगत विविध आसने विद्यार्थ्यांकडून व शिक्षकांकडून करून घेतली. मा. नगरसेविका स्वरदा बापट कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या.
एन.ई.एम.एस शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हेमांगी देशमुख, नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका मा.हेमा जाधव तसेच लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष विश्वास शेंडे यांच्या उपस्थितीत संपूर्ण कार्यक्रम पार पडला.
दुपार विभागात कबीर बाग मठ संस्थेकडून आलेले योग शिक्षक श्री. गिरमाजी चांदणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांकडून प्राणायाम तसेच ताडासन,वृक्षासन, नौकासन यांसारखी आसने करून घेतली.
क्रीडा शिक्षक प्रमोद उकिर्डे व देविदास वाकळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन केले.
जागतिक संगीत दिनानिमित्त शाळेचे माजी विद्यार्थी ओजस रानडे व तन्मय देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत व पाश्चात्य संगीत यातील फरक सांगत हार्मोनियम आणि कीबोर्ड वर काही रचना वाजवून दाखवल्या व संगीत आणि योग या दोन्ही मानवी मन आणि शरीराला शांत, निरोगी ठेवणाऱ्या प्राचीन भारतीय कला आहेत हे पटवून दिले.