दिनांक 22 जून 2026
डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक शाळेत आज उत्साहात व आगळ्यावेगळ्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी ईशा फाउंडेशनच्या चांदणी दुग्गड , संकेत रसाळ,रेणुका पवार आणि जान्हवी जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्वप्रथम क्रीडा शिक्षक सोनाली घोरपडे यांनी योग दिनाची माहिती सांगितली . शुभांगी गवारी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी 12 सूर्यनमस्कार घातले त्यानंतर , विविध आसने केली .यावेळी समीक्षा इस वे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक आसनाचे नाव व त्याचे फायदे सांगितले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्राणायाम, योगाभ्यास ,मेडिटेशन याचे जीवनातील महत्त्व सांगितले व प्रात्यक्षिक करून घेतले .शाळेच्या मुख्या. सुरेखा जाधव यांनी मुलांना जीवनातील योगाचे महत्त्व सांगितले. अनघा कडू यांनी सूत्रसंचालन केले. योगेश आंबेकर यांनी आभार मानले. ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे , विठ्ठल मोरे यांनी कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले. आज पासून रोजच सूर्यनमस्कार , योगासने , प्राणायाम करणार अशी शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
वार्तांकन
सौ. शहनाझ हेब्बाळकर