पादचारी मृत्यू कमी करण्यासाठी पाऊल पुढे – हात समोर
वाहतूक जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम सो विमल बैगनवारे प्रशाल *दिनांक 20 जून 2026 वार शनिवार* रोजी
आयोजित करण्यात आला.
पुणे शहर वाहतूक शाखेच्या वतीने "पादचारी मृत्यू कमी करण्यासाठी पाऊल पुढे – हात समोर" या विषयांतर्गत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत
*save Pune Traffic Movement* या स्वयंसेवी संस्थेअंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला.
रस्ते अपघातांमध्ये पादचाऱ्यांच्या वाढत्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे, सुरक्षित वाहतुकीबाबत जागरूकता निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याची सवय विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना घ्यावयाची काळजी, झेब्रा क्रॉसिंगचा वापर, वाहतूक सिग्नलचे महत्त्व, पादचारी मार्गाचा उपयोग, वाहनचालक व पादचारी यांची जबाबदारी तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी याविषयी 1981 च्या बॅचचे प्रशालेचे माजी विद्यार्थी
श्री निनाद पाटील यांनी शिक्षकांशी संवाद साधला.
रस्ता ओलांडताना मोबाईल फोनचा वापर टाळावा, धावपळ करू नये, वाहनांच्या वेगाचा अंदाज घेऊनच रस्ता पार करावा तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे. सुरक्षित वाहतूक ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून नियमांचे पालन केल्यास अनेक अपघात टाळता येऊ शकतात, असेही त्यांनी नमूद केले.
या उपक्रमामध्ये शिक्षकांनी वाहतूक सुरक्षेबाबत विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. तसेच सुरक्षित रस्ता वापराबाबत जनजागृती करण्याचा संकल्पही केला.
प्रभात रोड ,कर्वे रोडला जाऊन प्रात्यक्षिक करण्यात आले.
श्री.निनाद पाटील ,वासंती दुधाने , याना, साध्वी, प्रशालेचे पदाधिकारी व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
उपक्रमाला शिक्षकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला.