शि. प्र. मंडळीच्या मराठी माध्यम निगडी,शाळेत जागतिक योग दिन उत्साहात साजरा

शिक्षणविवेक    24-Jun-2026
Total Views |
 
spm
दि.२१ जून २०२६ वार: रविवार रोजी शिक्षण प्रसारक मंडळीच्या मराठी माध्यम ,निगडी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आजच्या दिनाच्या औचित्य साधून सकाळच्या आनंददायी वातावरणात शाळेच्या प्रांगणात सरस्वती पूजन करून योगासनास सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमासाठी आवर्जून
शाळा समिती अध्यक्ष मा. ॲड. प्रा. डॉ. राघव अष्टेकर सर यमुनानगर परिसरातील नगरसेवक मा. बापूशेठ घोलप व मा. प्रा.  उत्तमजी केंदळे उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून शारदा रिकामे (योगशिक्षिका पतंजली योगपीठ व विशेष कार्यकारी अधिकारी ( महाराष्ट्र शासन), अनिता फुलारी, सौ. संदिपा मोरे (योगसाधक व सहयोग शिक्षिका) *सौ. सुरेखा राठोड* ( सहयोग शिक्षिका), .भास्कर रिकामे ( सावरकर मंडळ कार्याध्यक्ष) व मा. श्रीकांतजी मापारी ( पर्यावरण प्रेमी, सायकलपटू, गिर्यारोहक ) उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्या यांनी योग दिनाचे महत्त्व सांगून त्याचा शारीरिक,मानसिक व बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी कसा उपयोग होतो याविषयी मार्गदर्शन केले.तसेच *दररोज योगासन, प्राणायाम* केल्यामुळे आपल्या शरीराला त्याचे होणारे फायदे सांगितले. शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले.
शाळेतील क्रीडा शिक्षिका शीतल महांकाळे यांनी पाहुणे परिचय करून दिला व शिक्षिका अर्चना जाधव यांनी योग दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.
क्रीडा शिक्षक शिवाजी बांदल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
विद्यार्थ्यांकडून योग हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचा संकल्प करून, शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
शाळा समिती अध्यक्ष मा. ॲड. प्रा. डॉ. राघव अष्टेकर यांच्या संकल्पनेतून,मा. मुख्याध्यापिका सविता बिराजदार यांच्या मार्गदर्शनाने तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या सहभागातू सकाळच्या आनंददायी वातावरणात आजचा योग दिन कार्यक्रम संपन्न झाला.