न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग जनजागृती कार्यक्रम

शिक्षणविवेक    24-Jun-2026
Total Views |
des
 
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेच्या पर्यावरण विभागाने, चालू शैक्षणिक वर्षात पाणी बचत आणि पाण्याचा सुयोग्य वापरासाठी जनजागृती करण्याचे ठरवले आहे. त्यातील पहिला जलदिंडीचा उपक्रम आज आयोजित करण्यात आला होता.
प्रशालेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी, 'पाणी वाचवा, निसर्ग वाचवा' 'जल है, तो कल है' 'पाण्याचे रक्षण, हेच पृथ्वीचे संरक्षण' अशा घोषणांच्या माध्यमातून जनजागृती केली.
प्रारंभी प्रशालेच्या शाळा समितीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन, बचत करण्याची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले.
पाऊस लांबल्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या जनजागृती कार्यक्रमात जलदिंडीसह, जलप्रतिज्ञा आणि प्रशालेच्या परिसरातील घरांमध्ये व व्यापारी मंडळींशी प्रत्यक्ष संपर्क करुन जागृती करणाऱ्या उपक्रमांचे आयोजन पुढील वर्षभर करण्यात येणार आहेत.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका आशा माने, उपमुख्याध्यापक महेश जोशी, पर्यवेक्षिका अंजली गोरे, मंजुषा शेलुकर यांच्या मार्गदर्शनात पर्यावरण विभाग प्रमुख हेमंत पाठक यांनी या जलदिंडीचे आयोजन केले.