एच. ए. स्कूल प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागात विविध उपक्रमांनी शाहू महाराजांना आदरांजली

शिक्षण विवेक    30-Jun-2026
Total Views |
des
दिनांक 26 जून 2026
डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक शाळेत आज सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे जीवन देणारे आरक्षणाचे प्रणेते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना विविध कार्यक्रमांनी आदरांजली अर्पण करण्यात आली.
सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुरेखा जाधव , ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे , डॉ. श्री. विठ्ठल मोरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विवेक वाखुरे सरांनी मुलांना माहिती सांगितली. तसेच शिवराज विटकर हा विद्यार्थी शाहू महाराजांच्या वेशभूषेत आला होता व त्याने महाराजांचे मनोगत व्यक्त केले.समीक्षा इसवे यांनी लिहिलेले शाहू महाराजांवरील गाणे गीत मंचातील समीक्षा इसवे , अनधा कडू , अनिता येनगुल व रत्नाकर वरवडेकर यांनी सादर केले .अनिता येनगूल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.यावेळी शाहू महाराज व सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते चौथीच्या एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनीला शाळेतर्फे भेटवस्तू देण्यात आली . इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांविषयी गाणे सादर केले. अशा प्रमाणे विविध कार्यक्रमांद्वारे शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यात आली.
*वार्तांकन*
सौ.शहनाझ हेब्बाळकर