रमणबाग प्रशालेत बहुआयामी तासिकेचे उद्घाटन

शिक्षणविवेक    30-Jun-2026
Total Views |
des
 
विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व सर्वांगाने बहरुन येण्यासाठी रमणबाग शाळेत दर शनिवारी बहुआयामी ही आनंददायी तासिका अनेक वर्षांपासून सुरू आहे. शासनाच्या 'आनंददायी शनिवार' या उपक्रमास ही तासिका पूरकच आहे. शनिवार दि. 27 जून रोजी प्रशालेत या तासिकेचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेते विराजस कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले , विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण तुमच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी तुमच्या शाळेने बहुआयामी तासिकेची योजना केली आहे.शालेय वय खूप महत्वाचं असतं, शाळेत आपण जे विषय शिकतो ते पुढील जीवनात आपल्याला निश्चितपणे उपयुक्त ठरणार आहेत."
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका आशा माने यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी अभ्यासाबरोबरच बहुआयामी तासिकेचे महत्त्व सांगितले.
शिवराज्याभिषेकोत्सवदिनानिमित्त हेमंत पाठक यांनी चिंतन सादर केले. त्यावेळी त्यांनी राजर्षी शाहू महाराजांविषयी देखील माहिती सांगितली.
बहुआयामी तासिकेच्या उद्घाटनानिमित्त नाट्यछंदविभागप्रमुख रवींद्र सातपुते यांनी नाट्यछंद वर्गातील विद्यार्थ्यांना घेऊन पाणी बचतीचे महत्त्व सांगणारे मूकनाट्य सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली भोकरे यांनी केले,पाहुण्यांचा परिचय ऋचा कुलकर्णी यांनी करुन दिला तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक महेश जोशी यांनी केले.व्यासपीठावर यावेळी पर्यवेक्षिका अंजली गोरे, मंजुषा शेलूकर आणि शिक्षक प्रतिनिधी सुधा लांडे उपस्थित होत्या.