समुहगीत गायन स्पर्धा
विषय - 'वन्दे मातरम्'
वर्ष-२०२६ या स्पर्धत सादर करण्यात येणाऱ्या गीतांविषयी स्पर्धेची नियमावली,
1) ' वन्दे मातरम्'' या गीताचे किंवा शब्दांचे महत्व सांगणारे गीत असावे.
2) हे गीत हिंदी ,मराठी किंवा संस्कृत भाषेतच असावे.
3) मराठीतील,हिंदीतील किंवा संस्कृत मधील काही रचना आम्ही पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देऊ, त्यातील एक गीत निवडता येईल. (ही यादी अंतिम नाही.)
4) या गीतांव्यतिरिक्त 'वन्दे मातरम्' शब्द असलेले अन्य गौरवगीत किंवा मुद्दाम नव्याने लिहिलेले गीतही सादर करता येईल.
5) मराठीतील ' वेदमंत्राहून आम्हा वंद्य वन्दे मातरम्' हे अशा प्रकारच्या गौरवगीताचे उत्तम उदाहरण आहे.
6) या स्पर्धेतील सादरीकरणात संपूर्ण 'वन्दे मातरम्' चे सादरीकरण नसावे.
7) गीताचा कालावधी कमीत कमी ३ मि. व जास्तीत जास्त ५ मि.. इतका असावा.
8) समूहात स्पर्धक संख्या कमीत कमी ८ व जास्तीत जास्त १२ इतकी असावी. यात वादक कलाकार समाविष्ट नाहीत. मंचावरील एकूण वेळ १० मि. असेल याची नोंद घ्यावी. (सादरीकरणासह)
9) संवादिनी व तबला अथवा ढोलकी, ढोलक किंवा इतर वाद्यवृंद यांची संख्या चार पेक्षा जास्त नसावी. इलेक्ट्रॉनिक वाद्यांना परवानगी नाही. तसेच ट्रॅकवर गाणे सादर करता येणार नाही.
10) स्पर्धा तीन गटात होईल
1) इयत्ता 5 वी ते इयत्ता 7 वी
2) इयत्ता 8 वी ते इयत्ता 10 वी
3) कनिष्ठ महाविद्यालय
11) एका संस्थेस तिन्ही गटात सादरीकरण करता येईल.
12) ही स्पर्धा पुणे जिल्हयातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी खुली आहे.
13) स्पर्धेच्या वेळी स्पर्धक गणवेशात असावा, सोबत ओळखपत्र तसेच शाळेचे पत्र आवश्यक आहे.
14) प्रवेश अर्ज (दोन प्रतीत ) पाठविण्याची अंतिम तारीख १९ जुलै २०२६.
15) प्रवेश अर्ज प्रत्यक्ष