सांगली ,शनिवार दि.4-7-2026! पुर्व उच्चप्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026चा निकाल नुकताच जाहीर झाला.या परीक्षेत प्रशालेने झंझावाती यश मिळवले ! गुणवत्ता यादीत प्रशालेचा चि. श्रीधर रामचंद्र पाटील 272 गुण मिळवून शहरी विभागात प्रथम तर राज्य यादीत पंधरावा आला. जिल्हा गुणवत्ता यादीत चि.सोहम विजय पाटील 252 गुण मिळवून 19 वा ,कु.आसिया खालिद नदाफ 240गुण मिळवून 38 वी आली. कृष्णाली योगेश कुंभार हिने 240 गुण मिळवून 39 वा क्रमांक प्राप्त केला.अथर्व अधिराज कुलकर्णी 228 गुण मिळवून 76वा आला. तर ओवी मंदार घोटीकर हिने 224 गुण मिळवून 96 वा क्रमांक प्राप्त केला. विश्वराज हणमंत खराडे याने 222 गुण मिळवून 107 वा क्रमांक प्राप्त केला. या परीक्षेसाठी प्रशालेकडून एकूण 38विदयार्थी प्रविष्ठ झाले होते. एकूण निकाल 52.50%इतका लागला. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे शाला समिती अध्यक्ष मा. डॉ. विश्राम लोमटे, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.पुंडलिक माने,श्रीमती अनघा दणाणे,रामचंद्र पाटील, बाळकृष्ण पांढरे यांचे मार्गदर्शन लाभले.परीसरातून या विदयार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.