
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी मार्फत राबविल्या जाणाऱ्या पर्यावरण संरक्षणासाठी च्या विविधांगी उपक्रमातील आणखी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणून रेणावीकर विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी गोसंवर्धन उपक्रमांमध्ये सहभाग घेतलेला आहे.
यामध्ये गाईचे महत्त्व -पौराणिक आणि व्यावहारिक विद्यार्थी समजावून सांगणार आहेत.
परिसरातील प्रत्येक घरात जाऊन विद्यार्थी नागरिकांशी संवाद साधून गाईंचे महत्त्व सांगणार असून दिलेल्या कागदावर ते नागरिकांची स्वाक्षरी घेणार आहेत.
या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या मनावर पर्यावरण संरक्षणाच्या उपक्रमात गाईंचे असलेले महत्त्व आणि संवर्धनाची गरज याची चांगली समज निर्माण होईल.
या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक आणि विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.