न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेस जर्मन अतिथींची भेट

शिक्षण विवेक    14-Jul-2026
Total Views |
des

सोमवार दिनांक 13 जुलै रोजी जर्मन सरकारच्या झेड एफ ए, जर्मनी या संस्थेचे आशिया खंडाचे मुख्य सल्लागार आणि जर्मन भाषेचे विशेषज्ञ योर्ग ड्रेंकेलफोर्ट यांनी न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेस भेट दिली.
प्रशालेतर्फे श्री. ड्रेंकेलफोर्ट यांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशा माने यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन व उपमुख्याध्यापक महेश जोशी यांच्या हस्ते शाल देऊन प्रशालेमध्ये स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी बनवलेली पेंटिंग्स व अन्य कलात्मक भेटवस्तू रमणबाग प्रशालेच्या जर्मन भाषेच्या समन्वयक श्रीमती स्नेहल बुद्धिहाळ यांच्या हस्ते त्यांना देण्यात आल्या.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे युनिव्हर्सिटीच्या जर्मन भाषा समन्वयक डॉ. सविता केळकर, रमणबाग प्रशालेच्या पर्यवेक्षक श्रीमती अंजली गोरे व श्रीमती मंजूषा शेलूकर, डेंक या संस्थेचे संचालक व जर्मन भाषेचे अध्यापक पार्थ सिद्धये, जर्मन भाषेच्या अध्यापिका वृषाली बापट तसेच रमणबाग प्रशालेतील जर्मन भाषेच्या मार्गदर्शक श्रीमती शारदा जोशी हे उपस्थित होते.
ड्रेंकेलफोर्ट यांनी प्रशालेच्या मुख्याध्यापिका आशा माने, डॉ. सविता केळकर, पार्थ सिद्धये, वृषाली बापट व शारदा जोशी यांच्याबरोबर प्रशालेतील जर्मन अध्यापनाबाबत चर्चा केली.
रमणबाग प्रशालेने केलेल्या हृद्य स्वागताने आनंदित झालेल्या श्री. ड्रेंकेलफोर्ट यांनी प्रशालेतील पेंटिंग्स करणाऱ्या व कलात्मक भेटवस्तू बनवणाऱ्या कलाकार विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच प्रशालेतील जर्मन भाषेच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.