एच.ए. स्कूल प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागामध्ये आज अवतरले विठ्ठल रखुमाई

शिक्षण विवेक    15-Jul-2026
Total Views |
des

दिनांक 14 जुलै 2026
डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक शाळेमध्ये आज पालखीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या , व संत तुकाराम , संत नामदेव, संत रामदास ,संत ज्ञानेश्वर , संत मुक्ताबाई ,संत जनाबाई अशा विविध संतांच्या पोशाखात आले होते. मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले होते.... तर मुलांनी टाळ , मृदंग , भगवी पताका हातात घेतली होती. शुभ्रा जगताप रुक्मिणी तर स्पंदन शीलवंत विठ्ठलाच्या वेशभूषेत आले होते.
सर्वप्रथम मा. मुख्याध्यापिका सौ सुरेखा जाधव , ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे , डॉ. श्री विठ्ठल मोरे यांच्या हस्ते पालखीचे पूजन व विठ्ठलाची आरती करण्यात आली . यानंतर इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी वारीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण रिंगणाचे सादरीकरण केले. पारंपरिक वेशभूषेतल्या मुलींनी फुगड्या सादर केल्या. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी रिंगणामध्ये पारंपारिक खेळांचे सादरीकरण केले. प्रतिभा पोटघन यांनी सूत्रसंचालन केले , योगेश आंबेकर यांनी मुलांना गोष्टी रूपात पालखीची माहिती सांगितली. यानंतर शाळेचे बाल वारकरी विठू नामाचा गजर करत , अभंग म्हणत एच. ए. कॉलनी मधील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गेले. त्यांच्यासोबत आमच्या बाल विठ्ठल रखुमाई ने सुद्धा मनोभावे विठ्ठलाचे दर्शन घेतले जगातील सर्वांना सुखी व आनंदी ठेव अशी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. संपूर्ण कार्यक्रमाची तयारी इयत्ता चौथी ने केली होती.
यावेळी समीक्षा इसवे , अनघा कडू , सीमा हांगे , अनिता येनगुल , डॉ.विठ्ठल मोरे , रत्नाकर वरवडेकर यांनी भजन, अभंग गाऊन वारकऱ्यांना साथ दिली. यावेळी विद्यार्थ्यांना शेंगदाणा चिक्की हा प्रसाद देण्यात आला.
*शब्दांकन*
सौ. शहनाझ हेब्बाळकर