एच.ए. स्कूल प्राथमिक विभागात विविध कार्यक्रमांनी कृषी दिन साजरा

शिक्षणविवेक    02-Jul-2026
Total Views |
des
दिनांक 1 जुलै 2026
डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूल प्राथमिक विभागामध्ये आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक यांची जयंती म्हणजेच कृषी दिन विविध कार्यक्रमांद्वारे साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव , ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे,डॉ. श्री.विठ्ठल मोरे व विद्यार्थ्यांच्या हस्ते शेतीच्या विविध अवजारांची पूजा करण्यात आली. यावेळी इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी समीक्षा इसवे यांनी लिहिलेल्या छान छान छान आमचे शेत किती छान..... या भाकरीच्या गोष्टी च्या गाण्यातून नृत्य सादरीकरणातून भाकरीचा प्रवास दाखविला व यातून अन्नाची नासाडी करू नये ,अन्न वाया घालवू नये हा संदेश दिला. गाण्यासाठी समीक्षा इसवे , अनिता येनगुल ,अनघा कडू यांनी तर डॉ.विठ्ठल मोरे सीमा हांगे आणि रत्नाकर वरवडेकर यांनी संगीताची साथ दिली .यानंतर एच. ए .कॉलनी परिसरातून वृक्षदिंडी काढण्यात आली.
यावेळी काही विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात तुळस , झेंडू व विविध शोभेच्या झाडांची रोपे लावली व विविध बियांची पेरणी केली. यातून वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन हा संदेश सर्वांना देण्यात आला. डॉक्टर विठ्ठल मोरे सरांनी जीवा शिवाची बैल जोड..... हे गाणे सादर केले. मा. मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांनी मुलांना रोप लावल्यावर त्याची रोज काळजी घ्या ,त्यांच्याशी बोला, त्याला हॅलो म्हणा असे मुलांना सांगितले. ज्योती भोसले यांनी मुलांना कृषी दिनाची माहिती सांगितली. सुप्रिया गावडे यांनी सूत्रसंचालन केले. इयत्ता तिसरी च्या सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मिळून कार्यक्रम सादर केला.
शहनाझ हेब्बाळकर