डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत आषाढ महिन्यातील प्रथम दिवस महाकवी कालिदास दिन साजरा.

शिक्षण विवेक    20-Jul-2026
Total Views |
des
 
बुधवार दि. १५ जुलै २०२६ रोजी नवीन मराठी शाळेत आषाढ महिन्यातील पहिला दिवस म्हणजेच महाकवी कालिदास दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नवीन मराठी शाळेत इयत्ता पहिली ते चौथी मौखिक संस्कृत हा विषय घेतला जातो, त्याची सुरुवात या दिवसापासून केली जाते असे यावेळी बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका हेमा जाधव यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वतीपूजन,
दीपप्रज्वलन व महाकवी कालिदासाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ज्येष्ठ शिक्षक धनंजय तळपे यांनी आपल्या प्रास्ताविकातून, "संस्कृत ही देववाणी म्हणून ओळखली जाणारी भाषा आहे,संस्कृतमुळे उच्चार अधिक स्पष्ट होतात म्हणूनच आपल्या शाळेत मौखिक संस्कृत विषय शिकवला जातो त्यातील श्लोक,काव्य पाठांतर करावे, समजून घ्यावे." असे सांगितले.तिसरी मुठा व चौथी शिवनेरी च्या विद्यार्थ्यांनी संस्कृत मधून देशभक्ती गीत, महालक्ष्मी अष्टक स्तोत्रम, श्लोक, सुभाषिते, गोष्टी सादर केल्या.शालासमिती अध्यक्ष श्री. राजेंद्र जोग यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम संपन्न झाला. सौ.स्वप्ना वाबळे यांनी सूत्रसंचालन केले तसेच महाकवी कालिदास यांची माहिती सांगितली. शिक्षक प्रतिनिधी योगिता भावकर यांनी आभार मानले. शिक्षिका अर्चना देव,भाग्यश्री हजारे,रूपाली सावंत,गायत्री बेलसरे,शीतल जाधव यांनी नियोजन केले.