डी. ई. एस. सेकंडरी शाळेत‘अंकुर मराठी वाङ्मय मंडळ’

शिक्षण विवेक    20-Jul-2026
Total Views |
des
पुणे : टिळक मार्ग येथील डी.ई.एस. सेकंडरी शाळेत मराठी विभागाच्या वतीने ‘अंकुर मराठी वाङ्मय मंडळा’चा उद्घाटन सोहळा ज्येष्ठ साहित्यिक श्याम भुर्के यांच्या हस्ते पार पडला.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका विजया जोशी,
उपमुख्याध्यापिका लक्ष्मी मालेपाटी, पर्यवेक्षिका राधा केतकर, काजल चौधरी, मराठी विषय शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविक विजया जोशी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय राघवेंद्र गणेशपुरे तर कंचन सोलापूरकर यांनी अंकुर मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्देशिकाचे वाचन व कार्यकारिणी मंडळाची माहिती दिली.
याप्रसंगी मराठी शिक्षकांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी मराठी अभिमान गीत, गार्गी निजामपूरकर हिने मराठी भाषा स्वगत, साहित्यिकांचे सादरीकरण(कवी कुसुमाग्रज) विहान सोनदे तर अभंगाचे निरूपण (संत चोखामेळा ) रिऱ्हान जमदग्नी या विद्यार्थ्यांनी सादर केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कला सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. प्राचार्य श्याम भुर्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मातृभाषेचे महत्त्व सांगितले. विनोदाचे महत्त्व सांगून आनंदी जीवनाचे सूत्र सांगितले. शिवाय शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. अंकुर मराठी वाङ्मय मंडळाला शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन राघवेंद्र गणेशपुरे, आभा जोशी, आद्य कुलकर्णी तर आभार गौरी देवळणकर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता पल्लवी धिवार यांनी पसायदानाने केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका विजया जोशी यांच्या मार्गदर्शनात मराठी विभागातील शिक्षक शिक्षिका गौरी देवळणकर, राघवेंद्र गणेशपुरे, पल्लवी धिवार, दीप्ती देवधर, कंचन सोलापूरकर, प्राची कुलकर्णी, अरुंधती क्षीरसागर, विद्या सोलसे, आरती घनवट, समृद्धी देशपांडे, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी आदिंनी परिश्रम घेतले.
राघवेंद्र रामकृष्ण गणेशपुरे
शिक्षक डी. ई. एस. सेकंडरी स्कूल, टिळक मार्ग,पुणे