आज दिनांक 18 जुलै 2026 या दिवशी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा सातारा येथे वारकरी दिंडीचे आयोजन मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ, मृदंग, वीणा, भगवे पताके आणि तुळशीची रोपे हातात घेऊन "ज्ञानोबा-तुकाराम", "पांडुरंग हरी विठ्ठल" अशा नामघोषात दिंडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. इयत्ता पहिलीचे विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी यांची वेशभूषा करून तसेच बरेच विद्यार्थी संतांची वेशभूषा करून आले होते.
मा.शालाप्रमुख तनुजा तिकोने मॅडम यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले.
ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती चव्हाण मॅडम,सौ.मनीषा मोरे सौ. मंगल साळुंखे व श्री. मिलिंद पवार यांनी अभंग, भारुडे आणि भक्तिगीते विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतली .
शाला समिती अध्यक्ष मा.श्री सारंग कोल्हापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्यातून हा उपक्रम अतिशय उत्तमरित्या संपन्न झाला.