विठ्ठल रखुमाई बोले, पंचकोशातून ज्ञान मिळे

शिक्षण विवेक    23-Jul-2026
Total Views |
des
 
दि. २२ जुलै २०२६ रोजी माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय, पूर्व प्राथमिक विभागात सकाळ व दुपार सत्रात पालखी सोहळा संपन्न झाला. पालखी सोहळ्याचा निम्मिताने मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख होऊन त्यांचा सामाजिक विकास व संस्कार कसे रुजवता येतील यावर भर दिला गेला. काही बालचमू सुंदर अशा विठ्ठल रुक्मिणीच्या वेषात आले होते तर काही संत ज्ञानेश्वर महाराज ,संत तुकाराम महाराज यांचे पोषाख करून आले होते. सर्व मुलांनी विठ्ठल नामाच्या गजरात पालखी शाळेच्या आवारात फिरवून आणली. पालखी फिरवून आणताना मुले विठ्ठल नामाचा जयघोष करीत आनंदाने नाचत होते, टाळांचा आवाज,झेंडे व वरिष्ठ गटातील विद्यार्थ्याच्या मृदुंग वादनाने वातावरण अधिकच प्रसन्न झाले होते.त्यामुळे नकळत मुलांच्या पंचकोशांचा विकास झाला. वारीची माहिती व गोष्ट सांगून विठ्ठलाची आरती प्रशालेच्या मुख्याध्यापक मा. सौ. अपर्णा ताई साने व ज्येष्ठ शिक्षिका प्रज्ञा ताई पोतदार, वर्षा ताई बागडे यांच्या हस्ते करण्यात आली. प्रसाद म्हणून मुलांना साखरफुटाणे देण्यात आले.
या पालखी सोहळ्याचे नियोजन व मार्गदर्शन शाळेच्या मा. मुख्याध्यापक सौ. अपर्णा ताई साने यांनी केले होते.