एच. ए. स्कूल प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागात लोकमान्य टिळकांना आदरांजली

शिक्षण विवेक    24-Jul-2026
Total Views |
des
दिनांक 23 जुलै 2026
डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेत आज लोकमान्य टिळकांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम साजरे करून आदरांजली वाहण्यात आली. सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव , ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे , डॉ. विठ्ठल मोरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित एका गाण्यावर छोटेसे नाटुकले सादर केले. यावेळी इयत्ता दुसरीचा अभिराज मदिवल हा विद्यार्थी लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत आला होता त्यानेही लोकमान्य टिळकांचे स्वगत सादर केले. यावेळी भारतीय थोर समाजसेवक क्रांतीकारक हा विषय देऊन लोकमान्य टिळकांच्या जयंती निमित्त प्रत्येक वर्गातून कथाकथन स्पर्धा घेण्यात आल्या व प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांची अंतर्वर्गीय स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी बाबू गेनू , विनोबा भावे ,इंदिरा गांधी ,लोकमान्य टिळक ,महात्मा गांधी, सरदार वल्लभाई पटेल ,सावित्रीबाई फुले , बिरसा मुंडा ,भगत सिंह , कणकलता बरुआ अशा विविध महान व्यक्तींच्या गोष्टी सादर केल्या.यामधील यशस्वी विद्यार्थ्यांना गोष्टींची पुस्तके देऊन गौरविण्यात आले. स्वाती पाटकर व रुपाली जाधव सूत्रसंचालन केले. ज्योती भोसले यांनी आभार मानले.
शहनाझ हेब्बाळकर