नवीन मराठी शाळेत कालिदास दिन व संस्कृत दिन उत्साहात साजरा

शिक्षण विवेक    24-Jul-2026
Total Views |
des
डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे च्या नवीन मराठी शाळा, सातारा येथे कालिदास दिन व संस्कृत दिन मोठ्या उत्साहात आणि संस्कृत भाषेप्रती आदरभाव जागृत करणाऱ्या विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास सौ. स्वाती देशपांडे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी शालाप्रमुख सौ. तनुजा तिकोने यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकातून संस्कृत भाषेचे महत्त्व व महाकवी कालिदास यांच्या साहित्य योगदानावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मंगल साळुंखे यांनी प्रभावीपणे केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ. मनिषा मोरे यांनी करून दिला. त्यानंतर सौ. सीमा घाटगे यांनी संस्कृत दिनाची माहिती सांगितली
या प्रसंगी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी संस्कृतमधील विविध गीते, नाटिका तसेच संस्कृत गीतांवर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाला कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ.स्वाती देशपांडे मॅडम यांच्याकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.कार्यक्रमाच्या शेवटी श्रीम. मनिषा चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.
शालासमितीचे अध्यक्ष मा. श्री. सारंग कोल्हापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाकडून या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत भाषेविषयी आवड, अभिमान आणि सांस्कृतिक जाणीव अधिक दृढ झाली.