बुधवार, दिनांक २२ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेमध्ये प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या जयंतीनिमित्त विज्ञान मंडळ, गरवारे प्रशाला आणि विज्ञान भारती, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच विज्ञान मंडळातील विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना आपल्या सूर्यमालेवर आधारित माहितीपूर्ण व्हिडिओ दाखविण्यात आला. त्यानंतर श्री. योगेश साळी व डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी सूर्यमालेची रचना, ग्रहांची वैशिष्ट्ये, अवकाश संशोधन आणि खगोलशास्त्राचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना रंजक व सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
यानंतर विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्याचे वाटप करून त्यांच्या हस्ते सूर्यमालेचे
क्लेमॉडेल तयार करून घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी अत्यंत आनंदाने, उत्साहाने व कल्पकतेने या उपक्रमात सहभाग घेतला. स्वतःच्या हाताने सूर्यमालेची प्रतिकृती साकारल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान पाहण्यासारखे होते. या कृतीशील उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानातील संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून समजल्या.
या कार्यशाळेसाठी प्रशालेचे मा . मुख्याध्यापक श्री. रोहिदास भारमळ सर व पर्यवेक्षिका श्रीमती जयश्री शिंदे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विज्ञान मंडळातील सर्व अध्यापक व प्रशालेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयन श्री. योगेश साळी व श्री. विलास रबडे सर यांनी उत्कृष्टरीत्या केले.