डी.ई.एस.सेकंडरी शाळेतआषाढी एकादशीनिमित्त पालखी,वारीचा भक्तिमय सोहळा साजरा

शिक्षण विवेक    25-Jul-2026
Total Views |
des
पुणे : ‘राम कृष्ण हरी, आम्ही वारकरी, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय! असा जयघोष, चंद्रभागेच्या तिरी उभा पंढरी, श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, चल गं सखे चल गं सखे पंढरीला, कानडा राजा पंढरीचा’ अशी भक्तिमय गाणी विद्यार्थी मोठ्या भक्तीभावाने गात होते. टिळक मार्ग येथील डी.ई.एस.सेकंडरी शाळेत मराठी विभागाच्या ‘अंकुर’ मराठी वाङ्मय मंडळाच्या (सकाळ व दुपार) वतीने देवशयनी आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेल्या पालखी, वारी, रिंगण सोहळ्याचे! शाळेत टाळ, तबला, हार्मोनियमाच्या संगतीने अभंग, भक्तिगीते गाऊन पालखी सोहळा साजरा करण्यात आला.
याप्रसंगी डी.ई.एस.सेकंडरी शाळेच्या उपमुख्याध्यापिका लक्ष्मी मालेपाटी, पर्यवेक्षिका राधा केतकर, काजल चौधरी आदी शिक्षक शिक्षिका,विद्यार्थी उपस्थित होते.
सकाळ विभागामध्ये प्रारंभी श्री विठ्ठल हरिनामाच्या नामस्मरण,जयघोष, गजरात पालखी काढून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर उपमुख्याध्यापिका लक्ष्मी मालेपाटी, पर्यवेक्षिका राधा केतकर, काजल चौधरी यांनी श्रीविठ्ठल रुक्मिणीचे, पालखीचे पूजन केले. अपूर्वा कुलकर्णी, पल्लवी धिवार, श्रिया मत्स्ये, विद्यार्थी विद्यार्थिनींनी अभंग व भक्ती गीतांचे गायन केले. इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत चोखामेळा आदी संतांची, वारकऱ्यांची सुंदर वेशभूषा परिधान केली होती. हरिनामाच्या जयघोषात शाळेतील विद्यार्थ्यांनी हरिनामाचा गजर,जयघोष केला. विद्यार्थ्यांच्या हातातील झेंडे, तुळशी वृंदावन भक्ती चैतन्य निर्माण करणारे होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल, संत, वारी, हरिपाठ याविषयी माहिती दिली. यात प्रांजल कापसे, अनुश्री कुलकर्णी, इहा खाडिलकर, स्वरदा फडके, सार्थक देवळे, आराध्या भोकरे, श्री लोहगावकर यांचा सहभाग होता. शिक्षिका, मुला मुलींनी फुगड्या खेळल्या. फुगड्या खेळण्याचा आनंद घेतला. रिंगणात अभंग व भक्ती गीताचे गायन केले. दुपार विभागामध्ये समूह गीत ‘आली कुठूनशी कानी टाळ मृदुंगाची धून’, गोष्ट ‘चांगदेवाचे गर्वहरण’ विपुल कुलकर्णी, अभंग गायन अर्णव मोहिते, आषाढी एकादशीचे महत्त्व स्वरा महिंद्रकर, वारीचे महत्त्व सिद्धी होले,वारी विषयावर कविता आद्या कुलकर्णी, आभा जोशी ( स्वलिखित कविता ), ‘देह विठ्ठल’ या भक्ती गीतावर नृत्य(इयत्ता आठवी ), वारी प्रतिज्ञा प्राची कुलकर्णी, वारी का साजरी केली जाते? आरती घनवट,विठ्ठल भक्ती गीतावर रिंगण, नृत्य, फुगड्यांचे सादरीकरण झाले. सूत्रसंचालन राघवेंद्र गणेशपुरे, आद्या कुलकर्णी, आभा जोशी, वल्लभ पाठक, गोजिरा कुलकर्णी यांनी केले. पल्लवी धिवार, भक्ती पटवर्धन यांनी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता केली.यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका विजया जोशी यांच्या मार्गदर्शनात मराठी विभातील गौरी देवळणकर, राघवेंद्र गणेशपुरे, पल्लवी धिवार, दीप्ती देवधर, प्राची कुलकर्णी, अरुंधती क्षीरसागर, विद्या सोलसे, आरती घनवट, समृद्धी देशपांडे, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
राघवेंद्र रामकृष्ण गणेशपुरे
शिक्षक डी.ई. एस.सेकंडरी स्कूल, टिळक मार्ग, पुणे ३०