लोकमान्य टिळक जयंती निमित्ताने नवीन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांची केसरी वाडा येथे क्षेत्रभेट

शिक्षण विवेक    25-Jul-2026
Total Views |
des
 
पुणे :दिनांक २३ जुलै २०२६ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेच्या
इयत्ता तिसरीच्या ३६० विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक जयंतीच्या निमित्ताने 'केसरी वाडा' येथे क्षेत्रभेट दिली.
शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र जोग यांच्या मार्गदर्शनाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका हेमा जाधव, ज्येष्ठ शिक्षक धनंजय तळपे ,योगिता भावकर, इयत्ता तिसरी चे वर्गशिक्षक यावेळी उपस्थित होते. केसरी वाडा येथे प्रथम लोकमान्य टिळकांच्या व मानाचा पाचवा गणपती असणाऱ्या केसरी वाडा येथील गणपती बाप्पाच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती करण्यातआली. स्वराज्याचा मंत्र देणाऱ्या लोकमान्य टिळकांचे खापर पणतू कुणाल टिळक यांनी यावेळी सर्वांचे स्वागत करून शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
शिक्षिका रूपाली सावंत ,स्वप्ना वाबळे यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनातील स्वातंत्र्य लढ्यातील प्रसंग,घटना सांगितल्या.
टिळकांच्या वस्तू ,जुन्या काळातील छपाई मशीन प्रिंटर , टिळकांच्या आयुष्यातील विविध प्रसंग, मंडाले तुरुंगात गीतारहस्य
लिहतानाची टिळकांची केसरी वाड्यातील प्रतिमा पाहून विद्यार्थी भारावून गेले. त्यांनी बारकाईने तेथील सर्व वास्तु व वस्तूंचे निरीक्षण केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व राष्ट्रीय शिक्षणाचे पुरस्कर्ते लोकमान्य टिळक यांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना आत्मीयता निर्माण व्हावी म्हणून या क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले असे मुख्याध्यापिका हेमा जाधव यांनी सांगितले.
पालक प्रतिनिधी प्रणव जोशी, शिक्षिका वैशाली जाधव,प्रतिभा पाखरे,सुषमा घडशी,प्रकाश राऊत यांनी आयोजन सहाय्य केले.