शिक्षण प्रसारक मंडळीच्या मराठी माध्यम निगडी शाळेत रंगला आषाढी वारी पालखी सोहळा

शिक्षण विवेक    25-Jul-2026
Total Views |
spm
दि. २४ जुलै २०२६ शुक्रवार रोजी शि.प्र. मंडळीच्या मराठी माध्यम शाळेत आषाढी वारीनिमीत्त पालखी सोहळा उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सविता बिराजदार व शाळेतील विद्यार्थी यांच्या हस्ते पालखी पूजनाने करण्यात आली.
ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात श्री विठ्ठल नाम जयघोष करत भक्तिमय असे वातावरण शाळेच्या प्रांगणात झाले होते.
यावेळी विठ्ठल- रुक्मिणी आणि वारकरी संतांच्या वेशभूषेत मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.
आजची पिढी ही सोशल मीडियाच्या प्रवाहात वाहत चालली असून आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची व संतांची विद्यार्थ्यांना जाण व्हावी ओळख व्हावी या उद्देशाने आषाढी वारीचे औचित्य साधून शाळेमध्ये कुलनीहाय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये छोटया मुलांसाठी वारकरी पोशाखातील वेशभूषा स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला व पोस्टर मेकिंग स्पर्धा* घेण्यात आली.
शाळेमध्ये अभंग, ओव्या, गवळण याचे सादरीकरण करण्यात आले . सर्व छोट्या वारकऱ्यांनी फुगड्यांचा आनंद घेतला.या दिवशी वारकरी पोशाखात आलेल्या छोट्या वारकऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली.
शाळेतील इयत्ता 2री तील विद्यार्थिनी अनुष्का खंडाळे हिने वारकरी गीत गायले.
संगीत शिक्षिका रमा मिस यांनी पालखीची गाणी गायली. शिक्षिका अर्चना जाधव यांनी वारी व वारीचे महत्व याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शाळा समिती अध्यक्ष मा. ॲड. प्रा. डॉ. राघव अष्टेकर यांच्या संकल्पनेतून,मा. मुख्याध्यापिका सविता बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत अतिशय आनंददायी व भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा साजरा झाला.