म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत ‘पावनखिंड दौड’ उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन.

शिक्षण विवेक    25-Jul-2026
Total Views |
des
म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत 'पावनखिंड दौड' उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये इतिहासप्रेम, देशभक्ती आणि शौर्याची प्रेरणा जागविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. *मा. मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे यांच्या नियोजनातून आयोजित या उपक्रमात इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.*
उपक्रमाची सुरुवात 'पावनखिंड' ही ऐतिहासिक चित्रफित दाखवून झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमावर आधारित प्रभावी नाट्यीकरण सादर केले. तसेच बाजीप्रभूंचा जोशपूर्ण पोवाडा सादर करून उपस्थितांमध्ये शौर्याची भावना जागृत केली. विद्यार्थ्यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची आकर्षक चित्रे रंगवून आपल्या कलागुणांचाही उत्कृष्ट आविष्कार घडविला.
*यावेळी इतिहास अभ्यासक श्री. अनिकेत यादव यांनी पावनखिंड आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या अतुलनीय शौर्याची प्रेरणादायी कथा विद्यार्थ्यांना सांगितली.* त्यांच्या ओघवत्या कथनातून विद्यार्थ्यांना स्वराज्याच्या इतिहासाची आणि बलिदानाची प्रेरणादायी ओळख झाली.
*या उपक्रमाचे शाला समिती अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ व महामात्रा डॉ. मानसी भाटे यांनी विशेष कौतुक केले. तसेच मा. मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे व मा. उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे आणि सादरीकरणाचे कौतुक करून त्यांना शाबासकी दिली .*