म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली येथे . 18 जुलै 2026 रोजी 'पावनखिंड दिन' अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेच्या विद्यार्थिनींमध्ये इतिहासाविषयी प्रेम, राष्ट्रभक्ती आणि स्वराज्याच्या प्रेरणादायी विचारांची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
मोहिमेची सुरुवात शाळेमध्ये स्थापित असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याजवळ नतमस्तक होऊन शिवज्योत प्रज्वलित करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत सकाळी 7 वाजता मोहिमेस सुरुवात करण्यात आली.
कासार आंबोली गावामध्येच असणाऱ्या शाळेपासून सुमारे 8.5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गवळीवाडा येथील भैरवनाथ मंदिरा पाठीमागील टेकडीवर महाराजांच्या नावाचा जयघोष करत विद्यार्थिनींना टेकडीवर नेण्यात आले.
9.30 वाजता टेकडीवर पोहोचल्यावर पावनखिंड या ऐतिहासिक घटनेविषयी शाळेचे सीनियर मास्टर श्री अद्वैत जगधने यांनी मुलींना सविस्तर माहिती दिली.
प्रशालाचे कमांडंट विंग कमांडर एम. यज्ञरामन प्राचार्या ज्योती खि्रीड यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे सैन्य व क्रीडा प्रशिक्षण प्रमुख श्री गजानन माळी, क्रीडा शिक्षक श्री महादेव मगर यांनी नियोजन केले