पुणे:बुधवार दिनांक २९ जुलै २०२६ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक कुणाल टिळक व त्यांची पत्नी श्रुतिका टिळक उपस्थित होते.
शालासमिती अध्यक्ष राजेंद्र जोग यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, सरस्वतीपूजन तसेच महर्षी व्यासांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापिका हेमा जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना, "आई,वडील,
गुरुजनांचा आदर करा, गुरुशिष्य परंपरेतून आपल्या संस्कृतीतील मूल्ये जोपासा ."असा संदेश दिला. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी गुरुशिष्य परंपरा दाखविणारे " महिमा गुरूंचा गुरूंचा...या गाण्यावर नृत्य आणि नाट्य सादर केले.
महर्षी व्यास गणपती,
सांदीपनी श्रीकृष्ण, द्रोणाचार्य अर्जुन, जिजाऊ शिवराय,
रामकृष्ण परमहंस विवेकानंद,श्यामची आई साने गुरुजी,रमाकांत आचरेकर सचिन तेंडुलकर अश्या गुरुशिष्य जोड्यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरण केले. शिक्षिका मीनल कचरे यांनी गुरुशिष्य गीताचे लेखन केले होते. गायन शिक्षिका वैशाली पाटील यांनी गीताचे गायन व वादन केले. अर्चना देव यांनी गुरुपौर्णिमेची माहिती सांगितली, स्वप्ना वाबळे यांनी सूत्रसंचालन केले. नवीन मराठी शाळेचे वैशिष्ट्य असणाऱ्या शाडू मातीच्या गणपती मूर्ती बनवण्याची सुरुवात गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर प्रमुख अतिथी कुणाल टिळक व सौ.श्रुतिका टिळक यांच्या हस्ते करण्यात आली. प्रणव जोशी सिद्धार्थ भावकर यावेळी
ज्येष्ठ शिक्षक धनंजय तळपे, योगिता भावकर, गायत्री बेलसरे, शीतल जाधव यांनी आयोजन सहाय्य केले.