गुरुपौर्णिमेचे औचित्य: एन.ई.एम.एस. शाळेत रंगला ज्ञान आणि संस्कारांचा सोहळा

शिक्षण विवेक    30-Jul-2026
Total Views |

des

गुरुपौर्णिमेचे औचित्य: एन.ई.एम.एस. शाळेत रंगला ज्ञान आणि संस्कारांचा सोहळा
शाळेच्या मुख्याध्यापिका हेमांगी देशमुख यांच्या हस्ते महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी "गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः..." हा श्लोक म्हणून केली.
त्यानंतर श्रीमती ज्योती पवार मिस यांनी गुरुकुल शिक्षणपद्धती आणि आजची शिक्षणपद्धती यांतील फरक समजावून सांगत अभ्यासाचे व गुरूंचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कार्यक्रमात सौ.नुपूर कुरुलकर मिस यांनी ध्यानाचे महत्त्व व फायदे समजावून सांगून विद्यार्थ्यांकडून ध्यान करून घेतले. सौ मनीषा पेठकर मिस यांनी पर्यावरण संरक्षण तसेच तुळस, कोरफड यांसारख्या औषधी वनस्पतींचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले, तर सौ.विभा मिस यांनी महर्षी व्यास यांची प्रेरणादायी कथा सांगितली.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन श्रीमती ज्योती पवार यांनी केले. हा संपूर्ण कार्यक्रम मुख्याध्यापिका सौ. हेमांगी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला.