लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात आज जुलै महिन्याच्या शिक्षण विवेक अंकाचे विमोचन करण्यात आले. संस्कार केंद्राचे मुख्याध्यापक मा. बालासाहेब केंद्रे ,उपमुख्याध्यापक मा.वसंत वाघमारे ,पर्यवेक्षक किरण नेमट , माधव मठवाले , तानाजी खोकले ,संस्था माध्यमिक विभागाच्या शिक्षणविवेक समन्वयिका अनिता यलमटे, शिक्षण विवेक प्रतिनिधी आशाताई कल्पे,श्री.कासनाळे सर्व शिक्षक वृंद यांनी ज्या विद्यार्थ्यांचे साहित्य जुलै महिन्याच्या अंकामध्ये प्रकाशित झाले आहे अशा विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील लेखनास शुभेच्छा दिल्या. तसेच अंक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बाललेखक व बालचित्रकारांचा गौरव करण्यात आला