दि.१ जुलै २०२६ वार - बुधवार रोजी *शि. प्र. मंडळीच्या मराठी माध्यम शाळेत शाळेचा वर्धापन दिन* मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात *सरस्वती पूजन,भारत माता पूजन व शिक्षण प्रसारक मंडळी* संस्थेचे *संस्थापक* कैलासवासी *श्री. कृष्णाजी बल्लाळ डोंगरे*,*श्री.रामकृष्ण भिकाजी उर्फ दामूआण्णा कुलकर्णी , श्री.रामचंद्र गोपाळ देव , श्री. दामोदर सदाशिव करंबेळकर* यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण प्रसारक मंडळी पुणे नियामक मंडळ सदस्य *मा. श्री अनिल बरवे* शाला समिती अध्यक्ष,निगडी *मा. ॲड. प्रा. डॉ. राघव अष्टेकर* , रुईया मूकबधिर विद्यालय पुणे येथील मुख्याध्यापिका *मा.सौ.संगिता शिंदे*, तरुण भारत वृत्तपत्राच्या पिंपरी -चिंचवड प्रतिनिधी *मा. सौ. अश्विनी पवार*, शाळेच्या मुख्याध्यापिका *मा.सौ. अम्रिता करनेल*( इंग्रजी माध्यम ), शाळेच्या मुख्याध्यापिका *मा. सौ.सविता बिराजदार* ( मराठी माध्यम ),तसेच शाळेचे *पालक प्रतिनिधी* उपस्थित होते.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या *कलागुणांना वाव मिळावा* या उद्देशाने नवीन शैक्षणिक वर्षात सुरू केलेल्या *घोष पथक साहित्याचे व ध्वजाचे* पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांकडून दि.२५ जून ते १ जुलै दरम्यान २,७०,००० दोरीवरच्या उड्या मारण्याचा संकल्प पूर्ण करून घेतला व वर्षभर विद्यार्थ्यांकडून *दोन कोटी* दोरीच्या उड्या विद्यार्थ्यांकडून मारून घेण्याचा *संकल्प* करण्यात आला, तसेच १ली ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी *कुलनिहाय हस्ताक्षर व श्रुतलेखन स्पर्धा* घेण्यात आल्या.
शाळेतील विद्यार्थ्यांनी आजच्या दिनाचे औचित्य साधून *नृत्य* सादर केले केले. इ 2 री तील विद्यार्थिनी *कु.माही तरटे* हिने नाट्य छटा सादर केली.कु.*श्रृती शिंपणकर* व शिक्षक *श्री. रविंद्र मुंगसे* यांनी संस्थेचा इतिहास व शाळेची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनातून *विद्यार्थ्यांचे कर्तव्य* स्पष्ट केले आणि शाळेच्या *भवितव्याविषयी शुभेच्छा* दिल्या
मा. अध्यक्ष यांनी शाळेला *शुभेच्छा देत शाळेच्या प्रगतीच्या दृष्टीने सुरू केलेल्या विविध पथकांविषयीची* माहिती दिली व विद्यार्थ्यांकडून वर्षभर या *पथकाची तयारी* करून घेतली जाईल असे सांगितले.
शाळेच्या मा.मुख्याध्यापिका यांनी आपल्या मनोगताद्वारे *शाळेच्या प्रगतीचा आढावा* घेतला.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या अंगावर शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त *फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव* करण्यात आला आणि त्यांना *खाऊ* वाटण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या सांस्कृतिक प्रमुख *सौ. मोनिका बोरसे* यांनी केले व आभार *सौ. अश्विनी नामदे* यांनी मानले.
कार्यक्रमाची सांगता *पसायदानाने* करण्यात आली.
शाळा समिती अध्यक्ष *मा. ॲड. प्रा. डॉ. राघव अष्टेकर* यांच्या संकल्पनेतून,मा. मुख्याध्यापिका *सौ.सविता बिराजदार* यांच्या मार्गदर्शनाने तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या सहभागातून शाळेचा वर्धापन दिन सकाळच्या आनंददायी वातावरणात संपन्न झाला.