रमणबाग प्रशालेत दहावीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ

शिक्षण विवेक    04-Jul-2026
Total Views |
des
शनिवार दिनांक 4 जुलै रोजी माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन केलेल्या 50 विद्यार्थ्यांचा गुणगौरव प्रशालेचे गुणवंत माजी विद्यार्थी डॉक्टर कृष्णा लाहोटी यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रशालेच्या मुख्याध्यापिका आशा माने यांनी शंभर टक्के गुण मिळवून प्रथम आलेल्या व आज प्रमुख पाहुणे असलेल्या माजी विद्यार्थ्याचे कौतुक करुन रमणबाग प्रशालेची यश परंपरा विद्यार्थ्यांना पुढे नेण्यास सांगितली.
प्रमुख पाहुणे दंतचिकित्सक कृष्णा लाहोटी यांनी जिद्द व मेहनतीने अभ्यास करुन विद्यार्थी दैदिप्यमान यश प्राप्त करु शकतात पण फक्त निश्चित ध्येय प्राप्त करण्यासाठी गरजेपुरताच मोबाईल वापरावा, असा संदेश दिला.त्यांना घडवण्यामध्ये शाळेचे व शिक्षकांचे योगदान खूप मोलाचे आहे असे त्यांनी अभिमानाने सांगितले. शाळासमिती अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी सकारात्मक विचारांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगून गुणवत्ता पूर्ण निकाल लावण्यासाठी काय प्रयत्न करावेत हे आपल्या संदेशातून विद्यार्थ्यांना सांगितले.
९८.४० टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या अमेय आगरकर व पालक अभय वैद्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळा समिती अध्यक्ष मिलिंद कांबळे, मुख्याध्यापक आशा माने,उपमुख्याध्यापक महेश जोशी, पर्यवेक्षक अंजली गोरे, मंजुषा शेलूकर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचे पारितोषिक देऊन कौतुक करण्यात आले. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीतील गुणवत्ताधारक शिष्यवृत्ती प्राप्त आरव शिंदे, अबीर शेवकर, प्रेम दुसाने या विद्यार्थ्यांचा देखील गौरव करण्यात आला.
बक्षीस पात्र विद्यार्थ्यांची नावे गीतांजली सरडे यांनी
वाचली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रतिभा वडनेरकर यांनी करुन दिला. ऋणनिर्देश अर्चना देवळणकर यांनी व्यक्त केला
तर सूत्रसंचालन वर्षा गानू यांनी केले.