दि. 5 जुलै 2026 वार -रविवार रोजी शिक्षण प्रसारक मंडळीच्या मराठी माध्यम, निगडी शाळेमध्ये इयत्ता 10 वी शै.वर्ष 2009 ते शै. वर्ष 2026 अश्या 10 वी च्या एकूण 18 बॅचेसचा भव्य माजी विद्यार्थी संघ स्नेहमेळावा शाळेच्या प्रांगणात उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून भारत माता व सरस्वती पूजनाने करण्यात आली
आजच्या स्नेहमेळाव्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून शि. प्र. मंडळी, पुणे संस्थेचे नियामक मंडळ अध्यक्ष मा. सुधीर काळकर सर, शाळा समिती अध्यक्ष मा. ॲड. प्रा. डॉ. राघव अष्टेकर शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सविता बिराजदार, शि. प्र. म.स्नेहबंध माजी विदयार्थी संघ अध्यक्ष- अजय पाटील ,उपाध्यक्ष - शताक्षी कुलकर्णी व कोषाध्यक्ष आदित्य गोलांडे व सर्व संघ सदस्य उपस्थित होते.
शिक्षकवृंदांनी जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले.
या मेळाव्यात शिक्षण, आरोग्य, पोलिस, विज्ञान-तंत्रज्ञान, , शेती, उद्योजक यासारख्या विविध क्षेत्रातील कार्यरत असलेले विदयार्थी,प्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रत्यक्ष वर्गातील बाकावर बसून वर्गातील किस्से, शाळेची घंटा, परीक्षा यासह बालपणातील रम्य आठवणी जागवत कार्यक्रम रंगतदार झाला.
या मेळाव्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेविषयी असलेली कृतज्ञता व सामाजिक जबाबदारी जपत, शाळेसाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी भेटवस्तू दिली.विद्यार्थ्यांनी सांगितलं की, "शाळेने आम्हाला खूप काही दिलं, आता आमचं काही देणं लागते आम्ही शाळेचे नेहमी कृतज्ञ असू " ही भेट शाळेतील विद्यार्थ्यासाठी उपयुक्त ठरणार असून, भविष्यातही असे उपक्रम राबवण्याचा मानस विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. तसेच माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांप्रती आदर व्यक्त करत त्यांचा स्मृतीचिन्ह भेटवस्तू देऊन सन्मान केला.
विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
प्रमुख अतिथी मा.काळकर सर व मा. अष्टेकर सर यांनी उपस्थित माजी सर्व विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी जपत जीवन जगण्याचे मूल्य* याबद्दल मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या वेळी अतिथीच्या हस्ते युवान 'राष्ट्रीयचळवळ भित्तिपत्रकाचे अनावरण करण्यात आले.कार्यक्रमाची सांगता शांतिपाठाणे करण्यात आली.
शि.प्र.मं स्नेहमेळावा 2026 हा तब्बल एकूण 18 बॅचेसचा 350 विद्यार्थ्यांचा एकत्र असा भव्य मेळावा म्हणजे केवळ एक भावनिक सोहळा नव्हता, तर विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेप्रती असलेलं प्रेम, कृतज्ञता आणि नाते पुन्हा एकदा दृढ केलं. शिक्षण प्रसारक मंडळीच्या मराठी माध्यम निगडी शाळेसाठी यशाच्या वाटचालीत हा मेळावा एक मानाचा तुरा ठरला कारण ." शाळेतील इयत्ता 10 वी तील पहिल्या बॅच मधील माजी विद्यार्थ्यांने आपल्या मनोगतातून अभिमानाने व्यक्त केले की माझी शाळा ही पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील पहिली शाळा असेल या शाळेत इयत्ता 10 वी च्या एकूण 18 बॅच चा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला.