नवीन मराठी शाळा ,सातारा येथे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी उत्साहपूर्ण वातावरणात वृक्षदिंडी आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात मा.शालाप्रमुख सौ. तनुजा तिकोने मॅडम यांच्या हस्ते वृक्षपूजनाने झाली. त्यांनी प्रत्येकाने एक तरी झाड लावा व त्याचे संगोपन करा असे सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांसाठी शेतीच्या अवजारांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. तसेच वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करणारे आकर्षक घोषफलक विद्यार्थ्यांनी तयार करून प्रदर्शित केले.
वृक्षदिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत, "झाडे लावा, झाडे जगवा", "वृक्ष आहे जीवनाचा श्वास" अशा विविध पर्यावरणपूरक घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करण्याचा संकल्प केला. श्री. मिलिंद पवार यांनी वृक्षांचे पर्यावरणीय, सामाजिक व आर्थिक महत्त्व या विषयी माहिती सांगितली.
शालासमिती अध्यक्ष मा. श्री. सारंग कोल्हापुरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ शिक्षिका श्रीम. मनिषा चव्हाण सांस्कृतिक प्रतिनिधी सौ मनिषा मोरे व सर्व शिक्षक शिक्षकेतरी कर्मचारी वृंद यांच्या सहकार्यातून या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.