
छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेच्या प्राथमिक विद्यालय विवेकानंद संकुल सानपाडा या शाळेतील साईराज अजित ढोले इयत्ता पाचवी याची महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद तर्फे घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये निवड झालेली आहे. ठाणे शहरी भागांतर्गत निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये त्याची निवड झालेली आहे. शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक त्याचप्रमाणे संस्थाचालक यांच्यातर्फे साईराज ढोलेचे अभिनंदन कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्राथमिक विद्यालय विवेकानंद संकुल तर्फे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सलग दुसऱ्या वर्षी शाळेला हे यश मिळालेले आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने शिक्षकांचेही याबद्दल अभिनंदन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ऋतुजा गवस यांनी शिक्षकांचे त्याचप्रमाणे साईराज ढोले चे कौतुक केले.