ज्येष्ठ विनोदी अभिनेत्री नयनाताई आपटे यांनी आज रेणावीकर विद्या मंदिरास भेट दिली

शिक्षणविवेक    08-Jul-2026
Total Views |
mes
 
माता अनुसया संस्था मुंबई यांच्यातर्फे अहिल्यानगर येथील माऊली सभागृहात होणाऱ्या दोन दिवसीय बालनाट्य महोत्सवाच्या निमित्ताने त्यातील मुख्य कलाकार पद्मश्री सन्मानाने विभूषित ज्येष्ठ विनोदी अभिनेत्री नयनाताई आपटे यांनी आज रेणावीकर विद्या मंदिरास भेट दिली.
याप्रसंगी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड आणि माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक चंद्रकांत गवळे सर, पूर्व प्राथमिक विभागाच्या विभाग प्रमुख मंजुषा कुलकर्णी तसेच माननीय शिक्षणाधिकारी ढवळे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माता अनुसया संस्थेचे सचिव श्री. प्रवीण कुमार भारदे आणि ज्येष्ठ अभिनेत्री नयनाताई आपटे यांनी विद्यार्थ्यांची नाट्य कार्यशाळा घेतली.
नवरसांचे अतिशय सुंदर प्रकटीकरण या दोघांनी आपल्या अभिनयातून विद्यार्थ्यांना दाखवून दिले.
तसेच या बालनाट्यांमध्ये काम करणारे शाळेचे गुणी विद्यार्थी रिया जोशी आणि विनायक गायकवाड यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
आपल्या मनोगतातून नयनाताई आपटे यांनी बालनाट्याचा इतिहास आणि माहिती विद्यार्थ्यांसमोर उलगडली.