रमणबागेत साकारले वर्ग ग्रंथालय

शिक्षण विवेक    11-Aug-2026
Total Views |
des
 
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, पुणे प्रशालेतील इयत्ता सहावी ग्रीन हाऊसच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षक श्री रवींद्र सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वर्गात *वर्ग ग्रंथालय* सुरू केले. यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या जवळील पुस्तके जमा केली. अगदी एका पुस्तकापासून तर काहींनी आठ ते दहा पुस्तके देखील जमा केली आहेत. या पुस्तकांची नोंद करुन त्याच्यावर वर्ग ग्रंथालयाचा शिक्का मारला आहे . या पुस्तकांची रजिस्टर मध्ये नोंद केली आहे. विद्यार्थीच आता वर्ग ग्रंथापाल होऊन विद्यार्थ्यांना पुस्तके देऊन देवघेव रजिस्टर मध्ये त्याची नोंद करणार आहेत. त्याचबरोबर वाचलेल्या पुस्तकाची माहिती आपल्या *वाचन वही* मध्ये नोंदवणार आहेत.
विशेष म्हणजे हा सर्व कार्यक्रम सहावी ग्रीन हाऊसच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला. पाहुण्यांसाठी देण्यात आलेले कागदी पुष्पगुच्छ विद्यार्थ्यांनी तयार केले होते. फलक लेखन, सजावट कलाशिक्षिका अंजली मालुसरे यांच्यासह विद्यार्थ्यांनी केली होती. विद्यार्थी सहभाग हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. .
रमणबागेचा माजी विद्यार्थी प्रसिद्ध कवी, गीतकार विराज कवी हे या वर्ग ग्रंथालयाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी मोबाईलवरील रील पहाण्यापेक्षा पुस्तक वाचन करा. ते किती महत्त्वाचे आहे हे पटवून दिले .वाचनाने आपली कल्पनाशक्ती वाढते याची जाणीव करून दिली. एक लाजरा मुजरा मुलगा आज एक कवी म्हणून या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून तुमच्यासमोर उभा आहे, हे केवळ पुस्तक वाचनामुळे आणि रमणबागशाळेमुळे शक्य झाले. असे त्याने आपल्या भाषणात नमुद केले.
मुख्याध्यापक आशा माने यांनी या उपक्रमाचे कौतुक करत वाचनाने आपण समृद्ध कसे बनतो हे पटवून दिले.यासह स्वतः उत्तम वाचक बनत आपण इतरांना वाचनाची प्रेरणा देणारे बना‌ अशी इच्छा व्यक्त केली.
यावेळी रवींद्र सातपुते यांनी लिहिलेली *वाचन प्रतिज्ञा* मल्हार कुलकर्णी यांने सर्वांकडून म्हणून घेतली. वाचन प्रतिज्ञा असणारे एक बुक मार्क सर्व विद्यार्थ्यांना पाहुण्यांना तसेच सर्व शिक्षकांना देण्यात आले. मयंक जाधव, अथर्व पाटील, रुद्र घाडीगांवकर, आदित्य खुळे श्रावक डेंगळे, तनय कुलकर्णी स्पर्श जाधव या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रशालेचे उपमुख्याध्यापक महेश जोशी पर्यवेक्षिका अंजली गोरे, मंजुषा शेलूकर पालक प्रतिनिधी रेणुका पाटील, चित्रकला शिक्षिका अंजली मालुसरे, संगीत शिक्षक हर्षद गाडगीळ सहावी ग्रीन हाऊस वर्ग मुख्यमंत्री मयंक जाधव वर्ग उपमुख्यमंत्री अमृतांश भोपते ,शिस्त मंत्री आरव कडू, अभ्यास मंत्री दुर्वेश अवसरे उपस्थित होते‌. कार्यक्रमाचे येथील पुस्तक गीताचे गायन आरव नवरे, वरद गाजरे, विपुल वाडेकर ,श्रावक डेंगळे, निनाद कुडले यांनी केले . तन्मय कुलकर्णी यांने ध्वनीमुद्रित गीताचे संयोजन केले. प्रशालेचे ग्रंथपाल श्री. शैलेश नागवडे यांचे देखील या उपक्रमास सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी हर्ष जाधव याने केले . आभार प्रदर्शन विद्यार्थी निनाद कुडले याने केले.