केशवराज' मध्ये शिक्षण विवेक ऑगस्ट २०२६ महिन्यातील अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
लातूर: दि.१०/८/२०२६ वार सोमवार रोजी श्री केशवराज विद्यालय,लातूर येथे शिक्षणविवेक ऑगस्ट महिन्यातील अंकाचे प्रकाशन विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.शैलेंद्र कंगळे सर,उपमुख्याध्यापक मा.श्री.महेश कस्तुरे सर,पर्यवेक्षिका श्रीमती अंजली निर्मळे मॅडम,श्री.राम जोशी सर,शिक्षणविवेक सहप्रमुख श्रीमती श्रीमती साधना प्रयाग, विद्यार्थी यांच्या हस्ते करण्यात आले. या महिन्याच्या अंकात कु. पंकजा होळंबे (६वी),चित्र चि. आयुष कतलाकुटे(७वी) चित्र,कु. अनोखी जखोटिया (७वी) चित्र, कु. ज्ञानेश्वरी गवळी (६वी)ओली माती कविता, चि प्रथमेश घोडके (९वी) चित्र,कु. अशीता शिंदे (८वी)चित्र, कु.अनुष्का पनगुले पाऊस कविता, पालक श्री धनंजय कच्छवे येता श्रावणाच्या सरी ही कविता, कु.गौरी पवार(९वी ) चित्र, अरहान शेख (९वी) ढग कविता हे साहित्य प्रकाशित झाले आहे. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.