निगडी : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारी, तब्बल १३८ वर्षांची दैदीप्यमान शैक्षणिक परंपरा लाभलेली *शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे* यांच्या वतीने शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी *शिक्षण प्रसारक मंडळीच्या,निगडी* येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी *'बी. आर. जोशी क्रॉस कंट्री स्पर्धे'चे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले*
सकाळी ठीक ७.०० वाजता स्पर्धेचा प्रारंभ झाला. यावेळी उपस्थित मान्यवर *ॲथलेटिक खेळाडू मा.श्री.अशोक काळे*
सर शाळेच्या मा. मुख्याध्यापिका *सौ. सविता बिराजदार, सौ.अम्रिता कर्नेल आणि सौ. लीना वर्तक* यांच्या हस्ते *भारत माता पूजन आणि दीपप्रज्वलन* करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.त्यानंतर *स्पर्धकांना आवश्यक सूचना दिल्यानंतर झेंडा दाखवून आणि स्टार्टिंग क्लॅपर वाजवून स्पर्धेचा शुभारंभ* केला.
ही स्पर्धा *१० वर्षांखालील, १२ वर्षांखालील आणि १४ वर्षांखालील मुले व मुली* अशा स्वतंत्र गटात घेण्यात आली. प्रत्येक गटासाठी *अनुक्रमे ६००, ८०० आणि १२०० मीटर* अंतर निश्चित करण्यात आले होते. यमुनानगर परिसरातून धावत स्पर्धकांनी पुन्हा शाळेच्या आवारातील अंतिम रेषा गाठत आपल्या जिद्दी, चिकाटी आणि क्रीडाभावनेचे दर्शन घडविले.
या स्पर्धेत सुमारे *७५० विद्यार्थ्यांनी* जोशपूर्ण सहभाग नोंदवत शाळेचा परिसर *क्रीडामय वातावरणाने* भारावून गेला.
विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ करण्यात आला. समारंभाची सुरुवात *सांघिक गीताने* झाली.
पारितोषिक वितरण समारंभासाठी *ॲथलेटिक खेळाडू मा.श्री.अशोक काळे सर* पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे *वैद्यकीय अधिकारी* *डॉ.कांचन केंद्रे*,*डॉ. शकील शेख* त्यांचे सहकारी *सुनील भोसले* *माजी विद्यार्थी संघाचे प्रतिनिधी, पालक व विद्यार्थी* उपस्थित होते. उपस्थित मान्यवर व शाळेच्या मा.मुख्याध्यापिका मराठी व इंग्रजी माध्यम यांच्या हस्ते प्रत्येक गटामधील *विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक,पदके व प्रशस्तीपत्रक* देऊन गौरविण्यात आले.
*मा. अशोक काळे* सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना *मार्गदर्शन* केले.
या स्पर्धेसाठी *पिंपरी - चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभागाने एक ॲम्बुलन्स व प्रथमोपचाराची सक्षम व्यवस्था* शाळेसाठी उपलब्ध करून दिली .तसेच
*निगडी पोलीस स्टेशनचे सहकार्य* मिळाले.
स्पर्धेदरम्यान स्पर्धेच्या सर्व मार्गावर शाळेतील शिक्षक, शिक्षक पायलट टीम, शिक्षकेतर कर्मचारी, इयत्ता ९ वी १० वी तील विद्यार्थी स्वयंसेवक , पालक प्रतिनिधी, माजी विद्यार्थी संघ प्रतिनिधी यांनी सर्व स्पर्धकांना योग्य मार्गदर्शन केले.
शाळेकडून सर्व स्पर्धकांना *पौष्टिक अल्पोपाहार* वाटप करण्यात आले.
शि.प्र. मंडळी,पुणे संस्थेने निगडी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या *बी. आर. जोशी क्रॉस कंट्री स्पर्धा संकल्पनेचे* सर्व पालकांनी भरभरून कौतुक केले.
या क्रीडा स्पर्धांचे सूत्रसंचालन शाळेचे क्रीडा शिक्षक *श्री शिवाजी बांदल* सर शिक्षिका *सौ. शोभा जोशी* यांनी केले,आभार शिक्षिका *सौ.वैभवी फडके* यांनी मानले.
विद्यार्थ्यांमधील *शारीरिक तंदुरुस्ती, आत्मविश्वास, शिस्त, सहनशक्ती आणि क्रीडासंस्कार जोपासण्याच्या उद्देशाने* आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा *अत्यंत जोशपूर्ण आणि उत्साहवर्धक* वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाली.
*शि.प्र.मंडळी, पुणे संस्थेचे* संकल्पनेतून व शाळेचे शाला समिती अध्यक्ष *मा. ॲड. प्रा. डॉ. राघव अष्टेकर सर* व *मा. श्री नवीन नायडू सर* यांच्या प्रेरणेतून ,शाळेच्या मा. मुख्याध्यापिका *सौ.सविता बिराजदार , सौ. अम्रिता कर्नेल व सौ. लीना वर्तक* तसेच शाळेचे *क्रीडा शिक्षक श्री. रफिक इनामदार, सौ. शीतल महांकाळे व श्री. शिवाजी बांदल* यांच्या मार्गदर्शनाखाली *सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक प्रतिनिधी व पालक* यांच्या सहकार्याने *सुमारे ७५० विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे* *शिक्षण प्रसारक मंडळीच्या समृद्ध क्रीडा* परंपरेला साजेसा अविस्मरणीय सोहळा सर्वांना अनुभवायला मिळाला.