पुणे : येथील डी.ई.एस.शाळेच्या सभागृहात प्री प्रायमरी, प्रायमरी, सेकंडरी शाळेच्या वतीने डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा ९ ऑगस्ट ‘संस्थापक दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल पराग मोडक, शाला समिती अध्यक्षा ॲडव्होकेट राजश्री ठकार, प्री-प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी बर्वे,प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना धनावडे, डी. ई. एस. सेकंडरी शाळेच्या मुख्याध्यापिका विजया जोशी, उपमुख्याध्यापिका लक्ष्मी मालेपाटी, पर्यवेक्षिका राधा केतकर, ग्रेसी डिसूजा, सिमरन गुजर, शिक्षक,शिक्षिका, पालक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
या प्रसंगी शिक्षण विवेक मासिकाच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त पराग मोडक, राजश्री ठकार यांच्या हस्ते शिक्षणविवेकच्या ऑगस्ट महिन्याच्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. शिक्षणविवेकच्या कार्याची माहिती राघवेंद्र गणेशपुरे यांनी दिली. सूत्रसंचालन पूर्वा आपटे आभार विजया जोशी यांनी मानले