डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा ९ ऑगस्ट ‘संस्थापक दिन’ साजरा करण्यात आला.

शिक्षण विवेक    11-Aug-2026
Total Views |
des
 
डी.ई.एस.चा ‘संस्थापक’ दिन
पुणे : येथील डी.ई.एस.शाळेच्या सभागृहात प्री प्रायमरी, प्रायमरी, सेकंडरी शाळेच्या वतीने डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा ९ ऑगस्ट ‘संस्थापक दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल पराग मोडक, शाला समिती अध्यक्षा ॲडव्होकेट राजश्री ठकार, प्री-प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी बर्वे,प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना धनावडे, डी. ई. एस. सेकंडरी शाळेच्या मुख्याध्यापिका विजया जोशी, उपमुख्याध्यापिका लक्ष्मी मालेपाटी, पर्यवेक्षिका राधा केतकर, ग्रेसी डिसूजा, सिमरन गुजर, शिक्षक,शिक्षिका, पालक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, दीपप्रज्वलन आणि संस्थापकांच्या प्रतिमेला हारार्पण करून झाली. हर्षदा कारेकर व विद्यार्थी यांनी सरस्वती वंदना गीताचे सादरीकरण केले. यानंतर राजश्री ठकार यांच्या हस्ते कर्नल पराग मोडक यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक अर्चना धनावडे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय राधा केतकर यांनी करून दिला.डी.ई.एस.संस्था, संस्थापकांची माहिती पूर्वा आपटे यांनी दिली.
कर्नल पराग मोडक यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वत्वाला जपून, कर्तृत्व गाजवून प्रामाणिक व कृतज्ञ राहावे, असे सांगितले. याप्रसंगी शिक्षण विवेक मासिकाच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त पराग मोडक, राजश्री ठकार यांच्या हस्ते शिक्षणविवेकच्या ऑगस्ट महिन्याच्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. शिक्षणविवेकच्या कार्याची माहिती राघवेंद्र गणेशपुरे यांनी दिली. यानंतर वैयक्तिक विविध क्रीडा प्रकार स्पर्धेत, शिष्यवृत्ती, स्काऊट आणि दहावीच्या बोर्ड परीक्षेत यश प्राप्त करणाऱ्या मेरीट विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षिका सुनेत्रा वेदपाठक, योगिनी कानडे, शीतल शिंदे, नीता उंब्रजकर, पूर्णिमा धुलप, प्रवीण जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.यात प्री -प्रायमरी, प्रायमरी, सेकंडरी शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. सूत्रसंचालन पूर्वा आपटे यांनी केले. आभार विजया जोशी यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् ने झाली. मुख्याध्यापिकांच्या मार्गदर्शनात सर्वांनी परिश्रम घेतले.
राघवेंद्र रामकृष्ण गणेशपुरे
शिक्षक डी. ई.एस. सेकंडरी स्कूल, टिळक मार्ग, पुणे ३०