रमणबाग प्रशालेत संस्थापक दिन क्रांतिदिन साजरा करण्यात आला.

शिक्षण विवेक    11-Aug-2026
Total Views |
des
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा संस्थापकदिन आणि क्रांतिदिन शनिवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. शालासमिती अध्यक्ष मिलिंद कांबळे, मुख्याध्यापिका आशा माने, शालेय पदाधिकारी यांच्या हस्ते आद्य संस्थापक विष्णुशास्त्री चिपळूणकर,लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर,महादेव नामजोशी, प्रथम अध्यक्ष छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि प्रथम कार्यवाह वामन शिवराम आपटे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यांच्या कार्याची माहिती ऋचा कुलकर्णी यांनी चिंतनातून विद्यार्थ्यांना करुन दिली. संस्था गीताचे गायन हर्षद गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापिका आशा माने यांनी डेक्कन एज्युकेशन संस्थेच्या थोर संस्थापक यांचा आदर्श ठेवून विद्यार्थ्यांनी चांगले नागरिक होण्याचा प्रयत्न करावा असे विद्यार्थ्यांना सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात शालासमिती अध्यक्ष श्री मिलिंद कांबळे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा संपूर्ण इतिहास विद्यार्थ्यांना समजेल, आवडेल अशा भाषेत उलगडून दाखवला.
यावेळी शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात उत्तम यश संपादन करणाऱ्या 32 विद्यार्थी आणि शिक्षकांचा डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे पंचायतनांचे सन्मान चिन्ह देऊन
गौरव करण्यात आला.
प्रशालेत तारांगण या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन आजच्या दिवशी करण्यात आले. यावेळी प्रशालेचे माजी विद्यार्थी प्रभंजन बोंगार्डे, सुजल धारणे हे उपस्थित होते. मुख्याध्यापक आशा माने, उपमुख्याध्यापक महेश जोशी, पर्यवेक्षक अंजली गोरे ,मंजुषा शेलूकर यांच्या मार्गदर्शनाने प्रज्ञा करडखेडकर
प्रतिभा वडनेरकर, गीतांजली सरडे, वैशाली भोकरे, यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा गानू यांनी केले, पारितोषिकपात्र विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन उषादेवी भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका मंजुषा शेलूकर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर शिक्षक प्रतिनिधी सुधा लांडे उपस्थित होत्या.