श्री संचारेश्वर प्राथमिक विद्यालयात शिक्षणविवेक अंकाचे विमोचन करण्यात आले.

शिक्षण विवेक    17-Aug-2026
Total Views |
bsps
 
आज दि. १५ ऑगस्ट २०२६ वार शनिवार रोजी श्री संचारेश्वर प्राथमिक विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी शिक्षणविवेक अंकाचे विमोचन करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्ष म्हणून स्थानिक अध्यक्ष महालिंगआप्पा कुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक कार्यवाह रविकुमार पेशकार, शालेय समिती अध्यक्ष वसंतराव पुराणिक, उपाध्यक्ष उल्हास जिंतूरकर, तालुका संघचालक सुरेशकाका ठोंबरे, तालुका कार्यवाह गणेश खवणे, स्थानिक सभासद भास्करराव अंबरवाडीकर, प्रसाद खेर्डेकर, दिलीपराव कोकडवार, रघुनाथराव खापरखुंटीकर, मीराताई खापरखुंटीकर,संगिताताई जिंतुरकर व मुख्याध्यापिका सुमती भारती आदि मान्यवर उपस्थित होते.