शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शाहिरी दिनानिमित्त आयोजित आंतरशालेय पोवाडा गायन स्पर्धेत न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, सेकंडरी विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या गटात (इयत्ता ८वी ते १०वी) द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. 🥈💐
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित ‘महाराष्ट्राचा पोवाडा' प्रभावीपणे सादर केला.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व सहभागी विद्यार्थी, त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मा. आसावरी सिंगासने मॅडम यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐💐
**विद्यार्थ्यांच्या कलागुणांना लाभलेली ही यशस्वी भरारी अशीच उत्तरोत्तर उंचावत राहो!*