श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालयात ऑगस्ट महिन्याच्या ‘शिक्षण विवेक’ अंकाचे विमोचन

शिक्षण विवेक    17-Aug-2026
Total Views |
bsps
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थी नेतृत्व गुण विकसन शिबिराचे आयोजन शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी दक्षिणमुखी हनुमान मंदिर, जुने माजलगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ऑगस्ट महिन्याच्या ‘शिक्षण विवेक’ अंकाचे विमोचन करण्यात आले.
यावेळी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे सहकार्यवाह माननीय श्री. अमरनाथजी खुरपे, प्राथमिक शालेय समितीचे अध्यक्ष माननीय श्री. पवनजी मानधने, शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. धनंजय गिराम, माजी विद्यार्थी श्री. बालासाहेब गिरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर झिंजुर्के, मंदिर व्यवस्थापक श्री. राऊळ, विभागप्रमुख श्री. रतन गिरी, ‘शिक्षण विवेक’ प्रतिनिधी अनुराधा लाहोरकर तसेच प्रसिद्धीप्रमुख श्री. अक्षय मोगरेकर यांची विशेष उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, वक्तृत्वकौशल्य, निर्णयक्षमता व सामाजिक जाणीव विकसित व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘शिक्षण विवेक’ अंकाच्या विमोचनामुळे कार्यक्रमाला विशेष वैचारिक व शैक्षणिक महत्त्व प्राप्त झाले.