गुरुवार दिनांक 13ऑगस्ट रोजी रमणबाग प्रशालेत वाङ्मय मंडळाचे उद्घाटन प्रसिद्ध लेखक,कवी नितीन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आशा माने यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय वाङ्गमय मंडळ प्रमुख अर्चना देवळणकर यांनी केला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तयार केलेल्या डिजिटल पीपीटीद्वारा उद्घाटन करण्यात आले. वाङ्मयमंडळ स्थापन करण्याचा हेतू वर्षा गानू व उषादेवी भोसले यांनी सांगितला.
त्यानंतर अथर्व यावलकर, तेजस कवितके, सोहम बागवे यांनी काव्य अभिवाचन केले.
प्रमुख पाहुणे नितीन शिंदे यांनी वाङ्मयमडळासारखे उपक्रम विद्यार्थ्यांचा बौद्धिक, भावनिक,वाचन विकास साधण्यासाठी, त्यांची सृजनशीलता वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत असे सांगितले. कविता म्हणजे आत्म्याचा हुंकार असून त्याचा रसास्वाद विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे असे सांगून स्वरचित विनोदी कविता सादर करुन त्यातून यशापयश पचविण्याचा संदेश विद्यार्थ्यांना दिला. उपमुख्याध्यापक महेश जोशी पर्यवेक्षक अंजली गोरे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक मंजुषा शेलूकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी सृजन शिंदे, श्रीपाद नुला यांनी केले.