न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

शिक्षण विवेक    17-Aug-2026
Total Views |
des
 
शनिवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी 80 वा स्वातंत्र्यदिन न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेमध्ये अतिशय उत्साहाने व आनंदाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख अध्यक्षपद म्हणून शालासमितीचे अध्यक्ष मिलिंदजी कांबळे हे उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाल्यानंतर वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.ध्वजारोहण
शाळासमिती अध्यक्ष मिलिंद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी मुख्याध्यापक आशा माने, उपमुख्याध्यापक महेश जोशी, पर्यवेक्षक अंजली गोरे, मंजुषा शेलूकर, इतिहास अभ्यासक व निवृत्त शिक्षक मोहन शेटे, शिक्षक प्रतिनिधी सुधा लांडे हे उपस्थित होते. राष्ट्रगीत,महाराष्ट्र गीत, शालेय प्रतिज्ञा, एनसीसी प्रतिज्ञा आणि व्यसनमुक्त भारत यावर प्रतिज्ञा घेण्यात आली. 'हे राष्ट्र देवतांचे'
हे समूहगीत संगीत शिक्षक हर्षद गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी सादर केले
मुख्याध्यापिका आशा माने यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मिलिंद कांबळे यांनी क्रांतिकारकांच्या बलिदानाचे स्मरण करुन भारताचे रक्षण करण्याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शाळेचे निवृत्त शिक्षक मोहनजी शेटे यांनी काँग्रेस भावनावर तिरंगा फडकविणाऱ्या हुतात्मा नारायण दाभाडे यांची गोष्ट सांगून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले.
विद्यार्थ्यांची सामूहिक कवायत रमेश शेलार यांनी घेतली. त्यानंतर एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी ध्वजाला मानवंदना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी प्रमुख राजेंद्र पवार यांनी केले. त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर, पालकवृंद हे सर्व या कार्यक्रमास उपस्थित होते.