शिक्षण विवेक अंकाचे उत्साहात विमोचन.

शिक्षण विवेक    17-Aug-2026
Total Views |
bsps
 
उदगीर (दि. १३ ऑगस्ट २०२६) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाईद्वारा संचलित लाल बहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत ‘शिक्षण विवेक’ अंकाचे विमोचन उत्साहात संपन्न झाले. शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे व संस्था सभासद चंद्रकांतजी धनबा यांच्या हस्ते अंकाचे विमोचन करण्यात आले.
याप्रसंगी मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, विभाग प्रमुख सुधाकर पोलावार, श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी, शिक्षण विवेकचे स्थानिक प्रमुख शिवबस खराडे व अभ्यासपूरक मंडळ प्रमुख माधव केंद्रे उपस्थित होते.
या अंकामध्ये शाळेतील तीन विद्यार्थ्यांची छायाचित्रे प्रकाशित झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, शैक्षणिक प्रगतीला आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळणे ही शाळेसाठी अभिमानाची बाब असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
‘शिक्षण विवेक’ हे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, ज्ञानाची भूक, विचारशक्ती, संस्कार आणि सामाजिक जाणीव निर्माण करणारे प्रेरणादायी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी नियमितपणे अंकाचे वाचन करून त्यातील ज्ञान आत्मसात करावे आणि स्वतःचे लेखन, चित्रकला व सर्जनशील उपक्रम यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मान्यवरांनी केले.
“वाचनातून ज्ञान, ज्ञानातून विचार आणि विचारातून व्यक्तिमत्त्व विकास” हा संदेश देत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला